इचलकरंजीत वाढदिवसादिवशीच…….

दहावीची पूर्वपरीक्षा झाली आणि एक महिन्यावर आलेल्या मुख्य परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासाचा ताण घेऊन नैराश्येतून इचलकरंजीतील विद्यार्थ्यांने गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास थेट राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तेजस शेखर वसकोर्ट (वय १६, रा. तोरणानगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. वाढदिवसादिवशीच त्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तेजस तोरणानगर भागातील सर्वसामान्य कुटुंबात राहत होता.

आई-वडील, बहीण असे त्यांचे कुटुंब. वडील यंत्रमाग कामगार तर आई मोलमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तेजस कुटुंबातील लहान सदस्य म्हणून त्याचे उत्तम संगोपन करून चांगले शिक्षण देण्यासाठी आई-वडिलांची धडपड होती. तो येथील एका माध्यमिक विद्यालयात शिकत होता.

काही दिवसांपूर्वी दहावीची पूर्वपरीक्षा त्याने सुरळीत दिली. आज सकाळी त्याने अभ्यास पूर्ण होत नसल्यामुळे व अभ्यासाचा ताण असल्याचे सांगत घरी रडत होता. बहिणीने त्याला समजावून सांगितले. दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तेजसने आत्महत्याच केल्याचे समोर आले.