सध्याच्या काळात मोबाईलचा वापर इतका सर्रास होत चालला आहे की, लहान मुलंही मोकळ्या वेळेत खेळ खेळण्याऐवजी स्मार्टफोन टॅब्लेट आणि लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवर वेळ घालवतात. लहान मुलाच्या हातात सतत गॅजेट्स राहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर आणि शरीरावरही परिणाम होतो. तसेच, मानसिक ताणही वाढतो. अनेक वेळा गॅजेट्समुळे इंटरनेटशी संबंधित धोका असतो. आज मुलांच्या हातात मोबाईल आल्याने इंटरनेटवर अश्लिल व्हिडीओ पाहणं फार सोपं झालं आहे. यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका देखील वाढण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
अनेकदा पालकांचा विरोध असतानाही मुलं अगदी सहजपणे फोन हाताळतात आणि वेगवेगळ्या साईट्सवर सहज जातात. अशा वेळी मुलांसाठी इंटरनेट किंवा फोन सुरक्षित करण्यासाठी पालकांना काही पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे.
तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल येताच त्याचा जर दुरुपयोग होऊ नये तसेच अॅडल्ट कंटेंट मुलांनी पाहू नये असं जर तुम्हाला वाटत असेलत तर सर्वात आधी तुम्हाला Android वर Google Play निर्बंध चालू करावे लागतील. हे मुलाला त्यांच्या वयासाठी योग्य नाहीत अशा ॲप्स, गेम्स आणि इतर वेबसाईट्स डाऊनलोड करण्यापासून प्रतिबंधित करेल. यासाठी सर्वात आधी मुलांच्या डिव्हाईसवरील Google Play Store वर जा. त्यानंतर डाव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्जवर जा. यानंतर तुम्हाला ‘Parental controls’ चा ऑप्शन दिसेल.
त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला पिन सेट करण्यास सांगितले जाईल. पिन सेट करून पालक कंट्रोल सेटिंग्ज बदलू शकतात. एकदा पिन सेट केल्यानंतर, तुम्ही प्रत्येक रेंजसाठी स्टोअर-आधारित वय निर्बंध सेट करू शकता. पालकांनी हा पिन फक्त मुलाला सांगू नये.
YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पालक कंट्रोल ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्ही सोशल मीडिया ॲप्सवर पॅरेंटल कंट्रोल सुरू केल्यास, तुम्ही मुलांच्या ॲक्टिव्हिटींचा सहज मागोवा घेऊ शकता आणि त्यांना चुकीच्या गोष्टी पाहण्यापासून थांबवू शकता.