अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूड असा सिनेप्रवास केला आहे. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांका चोप्राही आपल्या वर्किंग स्टाइलसाठीदेखील ओळखली जाते. सध्या प्रियांका ही हॉलिवूडपट ‘हेड्स ऑफ स्टेट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोईंगदेखील आहे.
सोशल मीडियावर प्रियांका आपल्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या काही ना काही गोष्टी शेअर करत असते. त्याशिवाय प्रियांका आपल्या कामाबद्दल, नव्या प्रोजेक्टचीदेखील माहिती देत असते.प्रियांकाने सोशल मीडियावर आपल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. प्रियांकाने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटातील स्टंट दरम्यान ही दुखापत झाली असावी असे म्हटले जात आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि कपाळावर रक्त असल्याचे दिसत आहे. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.