Dunki OTT release: अखेर प्रतीक्षा संपली! शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज

बॉलीवूडचा किंग खान अर्थातच शाहरुखच्या ‘डंकी’ (Dunki) या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं होतं. सिनेमागृहात  रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक या सिनेमाची ओटीटी माध्यमावर  आतुरतेने वाट पाहत होते.  व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुखने चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं म्हटलं होतं आणि  अखेर किंग खानने चाहत्यांना खूश केले आहे. शाहरुखचा डंकी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय. 

 राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन ईराणी यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. आता हीच जादू प्रेक्षकांना आता ओटीटीवर देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान हा डंकी सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

मागील बऱ्याच काळापासून या चित्रपटाचे राईट्स कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आहेत, यावर चर्चा सुरु होती. पण याबाबत भाष्य करत राजकुमार हिरानी यांचा डंकी हा सिनेमा ओटीटीवर आला आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या  नेटफ्लिक्सवर डंकी हा सिनेमा पाहता येणार आहे.