आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार पोलिसांची मेगाभरती! जून-जुलैपर्यंत भरती होणार पूर्ण

राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल, असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याची विशेषत: प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी असणार आहे.

शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.