मराठा आरक्षणाबाबत महत्वाची माहिती….

 राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती (Shivaji Maharaj Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्स सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील भाष्य केले आहे. ‘उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.  त्यामुळे ओबीसी (OBC) समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकारने उद्या (20 फेब्रुवारी) रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल अधिवेशनात मान्य केला जाणार असून, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लगले आहेत.