आज १९ फेब्रुवारी मराठ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती.अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिगाव (ता. वाळवा) येथील सिद्धी ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये गावातील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेतला आहे. सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना व उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. विजेत्यांना चषक, तसेच आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शैलजा पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित आहेत. स्पर्धेचे परीक्षण गणेश गायकवाड व धनश्री शेटे करणार आहेत. निवेदन मीरा शिंदे करतील.