भारतीय जनता पक्ष शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. हा बडा नेता कोण आणि शरद पवार गटाची यावर खेळी काय असले याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत. आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
येत्या काही काळात, लवकरच तो नेता भाजपवासी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठं खिंडार पडेल. आता हा मोठा नेता कोण आणि तो खरचं शरदप पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.