अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर…..

चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते. अनेकदा हे दोघे एकसोबत दिसले देखील. सोशल मीडियावरही यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसले.आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे मार्च महिन्यातच ब्रेकअप झाले. हेच नाही तर या दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच याबद्दल माहिती दिलीये.

ब्रेकअपनंतर अनन्या पांडे ही स्वत:ला यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र मैत्रिणींना देताना दिसत आहे.आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे याच्या ब्रेकअपचे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाहीये.आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.