उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडच्या लोहामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. गद्दार आहेत , माझ्यावरती आरोप करतात विचार सोडले , विचार सोडले नाही, निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा.केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन लढता. त्यांच्या युतीत ईडी , सीबीआय , आहेत . माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता, आता तेवीस तारखेला तुम्हालाही जनता तडीपार करणार आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
पुढची सत्ता आमची येणार आहे, तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. आर एस एसला मला विचारायचं आहे, 100 वर्ष झाले तुमच्या संघटनेला पण तुम्ही काय केलं? आता त्यांना कळालं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हव.
माता भगिनीला पंधराशे रुपये द्यायला पाहिजे. पण पण पंधराशे रुपयांमध्ये तुमचं घर तरी चालतं का? तुमचे पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत की, महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 देणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.