रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक नावाने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या खास आवाजातील ‘बहनों और भाईयो आप सुन रहे है…’ ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत.
Related Posts
Aishwarya Rai: ऐश्वर्या रायने सोडलं पती अभिषेक बच्चनचं घर? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
Aishwarya Rai Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या संदर्भात एक शॉकिंग न्यूज समोर आली आहे. ऐश्वर्या आणि…
आरक्षण आंदोलन पेटलं. रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड
आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने…
IPL 2025 च्या संदर्भात मोठे अपडेट्स! संघ कधी जाहीर, रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या सीझनची म्हणजेच आयपीएल 2025 संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. वृत्त आणि सूत्रांच्या हवाल्याने अनेक बातम्या समोर…