मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली आर्थिक तरतूद अद्यापही एसटी महामंडळाला पूर्ण मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून फक्त 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा निधी एसटी महामंडळाला विविध योजनांमार्फत देण्यात आला होता.
एसटी महामंडळाला ह्या वाईट अवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारकडून फक्त कागदावरच केला जातोय का? असे प्रश्न निर्माण होतायत. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून एसटी महामंडळाला विविध योजनांमार्फत दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र त्यातील 80 टक्के निधी अद्यापही मिळालाच नसल्याची बाब समोर आली आहे.