Republic Day Theme 2025: यंदा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा होणार? त्याचे कारण, थीम काय असणार? यंदाच्या परेडची खासियत जाणून घ्या

भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीतील मुख्य आकर्षण असेल.प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटना अंमलात आणल्याचा वर्धापन दिन आहे जो लोकशाही देशाच्या अस्तित्वाच्या स्मरणार्थ उत्सव म्हणून साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन 2025 च्या निमित्ताने, भारत आपला समृद्ध वारसा आणि विकासाचा प्रवास साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम, परेड आणि बक्षीस वितरणाशी संबंधित सर्व माहिती या लेखातून उपलब्ध होईल. या वर्षीच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे आणि तो कसा आणि कुठे साजरा केला जात आहे ते जाणून घेऊया.

प्रजासत्ताक दिन 2025 थीम

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम ‘ सुवर्ण भारत: वारसा आणि विकास ‘ आहे. ही थीम देशाचा वारसा जपत भारताच्या प्रगतीचा प्रवास प्रतिबिंबित करते.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडची थीम आणि मार्ग काय आहे?

प्रजासत्ताक दिनाची परेड 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. परेड दिल्लीतील विजय चौकापासून सुरू होईल आणि कर्तव्य मार्गाने लाल किल्ल्यावर जाईल.

परेडच्या विशेष माहितीनुसार

यंदा परेड 90 मिनिटांत पूर्ण होईल, ज्याची सुरुवात 300 कलाकारांसह होईल आणि या परेडमध्ये 18 मार्चिंग तुकडी, 15 बँड आणि 31 टॅबलेक्सचा समावेश असेल. या काळात एकूण पाच हजार कलाकार कर्तव्य पथावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

यंदा कितवा प्रजासत्ताक दिन होणार साजरा,76 की 77? त्याचे कारण काय?

दरवर्षी भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो. १ जानेवारी १९५० साली भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. तर २६ जानेवारीला १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. त्याचवेळेस भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात आली. प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापनदिन २६ जानेवारी १९५१ साली करण्यात आला. यावर्षी भारत राज्यघटना स्वीकारल्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.