राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. मराठा आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी आज दुपारी बैठक होणार आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम 1963 मध्ये राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील बाजार समित्या उद्या बंद राहणार आहेत.अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.२६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील.