मालिका विजयानंतर टीम इंडियाचा धमाका..

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडचा चौथ्या कसोटी सामन्यात 5 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने या विजायसह मालिका जिंकली. टीम इंडिया सध्या या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने या विजयासह आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे.टीम इंडियाचा भारतात हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय ठरला. टीम इंडियाच्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपासही कुणी नाही. टीम इंडियाने ही कामगिरी 2013-2024 या कालावधीमध्ये केली आहे.टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे.ऑस्ट्रेलियानंतर या यादीत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8-8 मालिका जिंकल्या आहेत.दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना हा धर्मशालेत खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.