वाशिम हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल

वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार शस्त्रानं निघृण हत्या केली, त्यानंतर पतीने स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गौतम ( वय 52 वर्षे ) असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे, तर ज्योती ( वय 45 वर्षे ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गौतम हा आपली पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलं आहे. त्याने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले, या घटनेत ज्योतीचा मृत्यू झाला, त्यानंतर गैतमने देखील गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपिर तालुक्यातील धोत्रा परिसरातल्या पिंप्री बुद्रुक गावात घडली आहे, गौतम ( वय 52 वर्षे ) आणि ज्योती ( वय 45 वर्षे ) अशी या प्रकरणातील मृत पती -पत्नीची नावं आहेत. गौतम हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे, गौतमने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केला, या घटनेत ज्योतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती आणि गौतम यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर संतप्त झालेल्या पती गौतम याने पत्नी ज्योतीवर तीक्ष्ण विळ्याने आणि लोखंडी टॉमीने जबर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर पती गौतम याने घरा शेजारील टिन पत्र्याच्या शेड मध्ये जाऊन गळफास घेउन आत्महत्या केली.

पिंप्री बुद्रुक गावात घडलेल्या पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास मंगरुळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्या सह त्यांचं पथक करत आहे. या प्रकरणात एक चार ओळीची चिठ्ठी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.