इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वामध्ये आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या वर्षीचा हा मुंबईतील कोणत्याही मैदानावरील पहिलाच आयपीएल सामना असणार आहे. त्यामुळे मुंबईकर क्रिकेट चाहत्यांमध्ये याबद्दल बरीच उत्सुकता आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ काही दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाला असून जोरदार सराव सुरु आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा सामना रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतरचा मुंबईतील पहिलाच समाना आहे. त्यामुळेच मागील काही सामन्यांमध्ये नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली गेल्याने आजच्या सामन्यात विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या बात्या समोर आल्या होत्या.
पंड्याला मुंबईकर क्रिकेट चाहत्यांकडून विरोध सहन करावा लागू शकतो असा अंदाज असल्याने विशेष सुरक्षा देण्यात आली असून पंड्याला डिवचणाऱ्यांवर पोलिसांचं लक्ष असणार आहे वर पोलीस अशा प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढतील अशा संदर्भातून बातम्या समोर आल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. खरोखरच आज वानखेडेच्या मैदानात पोलीस विरुद्ध चाहते असा संघर्ष रंगाणार का?