तज्ञांचा मोफत सल्ला! गर्भवती महिलांसाठी गरोदरपणातील आहारविषयी डॉ. केतकी साखरपे यांचे मार्गदर्शन……

नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही गरोदरपणातील गर्भवतीचा साधारणपणे आहार कसा असावा? याची थोडक्यात माहिती देणार आहोत. गर्भवतीने आपली तब्येत व आपले बालक सदृढ व निरोगी कसे होईल याचा विचार करायचा आहे.

पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटी, मळमळ, पोटात दुखणे, भूक कमी लागणे या सर्वसाधारण तक्रारी असतात. त्यासाठी शरीरातील ऊर्जा कायम टिकवण्यासाठी सात्विक आहार म्हणजेच राजगीरा लाडू, नाचणी सत्व, खीर, सुकामेवा, फळे, कोरडी बिस्किटे, पालेभाजी खाव्यात.

गरोदरपणातील खाद्यपदार्थ
1) स्नायूमध्ये येणाऱ्या पेटक्यांचा प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे कॅल्शियम व व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ खावेत. यासाठी दूध, दही, चीज, भिजवलेले बदाम इ.
2) तंतुमय व नैसर्गिक रेचकाची गुणवत्ता खालील पदार्थ मलावरोधास प्रतिबंध करतात. केळी, मोसंबी, संत्री, कच्ची कोशिंबरी, भेंडी, कोबी, भिजवलेले काळे मनुके, हिरव्या पालेभाज्या इ.
3) शरीराला पाचक व प्रथिनमुक्त खाद्यपदार्थ : फळांच्या कोशिंबरी, फळासहित ब्रेड, कोबी, गाजर, दुधी खीर इ.
4) न्याहारीसाठी पचणारे हलके पदार्थ : उपमा, पोहे, इडली, डोसा, ढोकळा, शेवयाचा उपमा, ब्रेड ऑम्लेट, व्हेजिटेबल, सँडविच इ.


5)मळमळ वाटण्यापासून आराम वाटण्यासाठी: लिंबूसरबत, चिंच व कैरी चटणी, लोणचे, कोकम सरबत इ.
6) सर्व व्हिटॅमिन्सचा पुरवठा : आवळा, पेरू, रताळे, पालक, कारले, अननस, लिंबू इ.
7) लोह व कॅल्शियमचा पुरवठा : खजूर, गुळ+ शेंगदाणे, सुकामेवा, बाजरी, दूध, बीट, खोबरे, रागी, हिरव्या पालेभाज्या इ.
8) व्हिटॅमिन ए चा पुरवठा : आंबा, गाजर इ.
9) व्हिटॅमिन बी कॅल्शियमचा पुरवठा : मोड आलेली कडधान्य, शेंगभाज्या, अंडी, दही, मटणाचे काळीज इ.

गर्भवती स्त्रियांनी रोजच्या आहाराविषयी कोणती खबरदारी घ्यावयाची आहे याची माहिती आपणास पुढील आठवड्यात 7 मार्चला नक्कीच मिळणार आहे.

डॉ. केतकी साखरपे
(MBBS, DGO,DNB)
साखरपे हॉस्पिटल,
फुले रोड इचलकरंजी
मोबाईल नंबर 7276122635