🤱आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. निरोगी, सदृढ आणि व्यंगरहीत बाळ जन्माला येण्यासाठी कोणत्या महिन्यांमध्ये कोणती तपासणी करणे गरजेचे आहे हे या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. गरोदरपणाचे तीन भागांमध्ये विभाजन केले जाते. पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही.
👉🏻 *पहिली तिमाही म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा महिना.* पहिल्या तिमाहीमध्ये खालील तपासण्या केल्या जातात.
1)* *रक्ततपासणी* यामध्ये (BC, blood group, HIV, VDRL, HBsAg, HCV, TSH, BSL CR)
2)* *लघवीतपासणी*
3)* *सोनोग्राफी* : a) मासिक पाळी चुकल्यानंतर पंधरा दिवसांनी पहिली सोनोग्राफी करावी. b) दुसरी सोनोग्राफी पहिल्या सोनोग्राफीनंतर एक महिन्यांनी करतात. यामध्ये बाळाची वाढ व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का ते पाहतात.c) तिसरी सोनोग्राफी तीन महिने पूर्ण झाल्यानंतर बारा आठवड्यांनी करावी. या सोनोग्राफीमुळे बाळांमध्ये काही जणूकीय दोष असेल तर त्याचे निदान देखील होऊ शकते.
👉🏻 *दुसरी तिमाही म्हणजे चौथा, पाचवा व सहावा महिना.* या महिन्यामध्ये गरोदर स्त्रीने प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलला तपासणीसाठी येणे गरजेचे असते. पाचव्या महिन्यात Targated anamaly scan ही 3D/4D सोनोग्राफी बाळामध्ये काही जन्मजात दोष आहेत की नाही यासाठी करतात. ही सोनोग्राफी खूपच महत्त्वाची असते.
👉🏻 *24 आठवड्यांनी Fetal Echocadiography ही बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी केली जाते.* ज्या गरोदर स्त्रियांना हृदयरोग आहे व ज्या स्त्रियांच्या पहिल्या बाळांमध्ये हृदयरोग आढळून आलेला आहे अशा गरोदर स्त्रियांनी ही तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
➡️यानंतरची तिसरी तिमाही…….पण तिसरी तिमाहीमध्ये कोणती तपासणी करायची हे आपण पाहणार आहोत 🤗 *22 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी……..*
✅ *डॉ. केतकी साखरपे* (MBBS, DGO,DNB) *साखरपे हॉस्पिटल* , *फुले रोड इचलकरंजी* 📱 *मोबाईल नंबर* 7276122635