इस्लामपुरातील हि इमारत बनली धोकादायक!

इस्लामपूर शहरातील उरुण चावडीची स्वातंत्रपूर्व काळापासून असलेली दगड मातीची जुनी इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उरुण चावडीची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. त्यामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी तातडीने येथे नवीन इमारत बांधावी. तसेच तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

उरुण चावडीची नवीन इमारत होईपर्यंत पालिकेने वाकोबा मंदिराजवळ बांधलेल्या इमारतीमधील ५ गाळे महसूल विभागाने संपादित केल्यास तेथे तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालेल.
याबाबत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले आहे. त्यावर दादासाहेब पाटील, अभिजित कुर्लेकर, अभिजित रासकर, अंकुश जाधव, स्वरूप मोरे, दिग्विजय पाटील. शकील जमादार.
संगीता कांबळे, हिंदुराव माळी, शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, विशाल सूर्यवंशी, खंडेराव जाधव यांच्या सह्या आहेत.