“आले रे आले मुंबई पोलीस”…गाणे तुफान व्हायरल!

 मुंबई पोलिसांची ओळख जगभरात आहे. कधीकाळी मुंबई पोलिसांची तुलना स्काटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जात होती. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. तसेच मुंबई हल्लाच्या वेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे देशभर कौतूक झाले होते. मुंबई पोलिसांमुळे शहरात रात्रीसुद्धा महिला न घाबरता बाहेर पडतात. मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर एक गाणे आले आहे. हे गाणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानेच तयार केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धूम केली आहे. गाण्याचे बोल आहेत, “आले रे आले मुंबई पोलीस”…

गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर mumbaipolice and cpmumbaipolice या कोलॅबोरेटेड पेजवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले की, “आले रे आले मुंबई पोलीस! ” पोलीस कॉन्सटेबल मयूर राणे यांनी हा गीत तयार केले आहे. मुंबई पोलिसांची वीरत या गाण्यामधून दाखवली गेली आहे. हे गाणे ऐकल्यानंतर मुंबई पोलिसांसंदर्भात अभिमानाची भावना तयार होणार आहे. #AaleReAaleMumbaiPolice असे कॅप्शन या व्हिडिओसोबत दिले आहे.

व्हिडिओमध्ये मुंबई शहराचे संरक्षण करताना मुंबई पोलिसांना दाखवले गेले आहे. मुंबई पोलिसांसोबत दुसऱ्या सुरक्षा संस्था कशा सतर्क असतात, हे यामधून दिसत आहे. मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या विविध रँकचे अधिकारी गाण्याच्या व्हिडिओमधून समोर येत आहेत. हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

गाण्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एक युजर्स म्हणतो, मुंबईकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई पोलिसांमुळे आम्ही निश्चिंत असतो, असे आणखी एक युजर्स म्हणतो. गाणे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. खूपच छान गाणं आहे आणि मुंबई पोलिसांचे काम पण, असे आणखी एक युजर्स म्हणतो.