हुपरी – इंगळी रस्त्याचे काम युध्दपातळीवर!

इंगळी सिध्दार्थनगर बाजूने हुपरी शहरात जाणारा रस्ता नेहमीच पाणथळ व दुषित पाण्यामुळे चर्चेत होता. या रस्त्याच्या दूरावस्थेमुळे नागरिकांतून व शेतकऱ्यांतून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. पावसाळ्यात या रस्त्यावरील गटारीचे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात प्रवेश करायचे. यातून अघटीत घटनेसह आरोग्याच्या समस्या उभ्या होत आहेत.
सातत्याने या रस्त्याचा प्रश्न उचलून धरला होता. हुपरी इंगळी रस्ता पुन्हा खचला तात्पुरत्या मलमपट्टीवर नागरिकांतून संताप’ हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला होता. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हालचाल करत उपकार्यकारी अभियंता एस. एस. पाटील यांनी ७ कोटींचे बजेट लावून संरक्षण भिंतीसह संपूर्ण रस्ते बांधकाम सुरू केले आहे.
राहायच्या. याविषयी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ओढ्याची खोली वाढवून, मजबूत ओढा संरक्षक भिंत बांधकाम सुरू केले आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे हातकणंगले तालुका विकास निधीच्या बाबतीत करवीर तालुक्यापेक्षा अव्वल ठरला आहे

१०० कोटींच्या आसपास जात आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा पाठपुरावा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. या रस्त्यावर पाण्याच्या निचऱ्यासाठी पाईप लाईन व ७०० मिटर संरक्षक भिंत असा दोन टेंडर मिळून ७ कोटींचा निधी खर्ची पडत आहे. रस्त्याची वाढलेल्या उंचीमुळे तसेच रस्ता बंद होण्याचे प्रकार घडलेले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूच्या शेतातील रेती वाहून जाणे, शेतात पाणी साठून राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे तर रस्ता कातरण्याचे प्रमाण घटणार आहे. यामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या आणि आंदोलनाचा भाग ठरलेल्या या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.