महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा सामनासोबत आता महिलांना साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
अंत्योदय शिधापत्रक धारकांना दरवर्षी एक साडी भेट देण्यात येणार आहे. यामुळे गरीबांना सणावाराला गोडधोड करण्यासोबत घरातील महिलांना नवीन साडी परिधान करुन सण साजरा करता येणार आहे.शिवजयंती निमित्त वितरित करण्याचा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहचला आहे.
या रेशन दुकानात आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाना मोफत साडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानूसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने ही साडी मिळणार आहे.
‘आनंदाचा शिधा’मध्ये साखर, तेल, रवा, चनाडाळ, मैदा, कच्चे पोहे या सहा पदार्थांचा समावेश आहे. अशातच आता अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार आहे. सहा मार्चपासून याचं जिल्ह्यात वाटप होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.