Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुक महाराष्ट्रात…..

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची  तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. निवडणूक आयोगाचीही तयारी पूर्ण झाली आहे. सुत्रांच्या महितीनुसार, 14 अथवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 

मागील चार लोकसभा निवडणुका  (2019, 2014, 2009 आणि 2004) पाहिल्यास, निवड आयोग 40 ते 50 दिवस आधी देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करतं. म्हणजे, तेव्हापासून देशात आचारसंहिता लागू होते.

16 जून 2024 रोजी 17 व्या लोकसभेचा (Lok sabha) कार्यकाळ पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाकडून  (Election Commission of India) लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 14 मार्च अथवा 15 मार्च रोजी  (lok sabha Election 2024) लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तेव्हापासूनच देशात आचारसंहिता लागू होईल.   18 व्या लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पण मागील चार लोकसभा निवडणुका आणि घटनात्मक तरतुदीच्या आधारावर आपण निवडणुका कधी होऊ शकतात, याचा अंदाज बांधू शकतो. 

लोकसभा निवडणुका 2024 च्या तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मागील चार लोकसभा निवडणुका पाहिल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाल्या आहेत. एप्रिल ते मे यादरम्यान सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.  2019 मध्ये  11 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या.  2014 मध्ये सात एप्रिलपासून, 2009 मध्ये 16 एप्रिलपासून तर 2004 मध्ये 20 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या. 

2024 मध्ये 18 लोकसभा निवडणुकीत एप्रिल ते मे यादरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. मार्च ते मे यादरम्यान देशभरातील हवामानही व्यवस्थित मानलं जातं. निवडणुका पाच ते सात टप्प्यात होऊ शकतात.