IND vs ENG : आज अखेरचा कसोटी सामना! भारत की इंग्लंड, कोण मारणार बाजी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने आधीच 3-1 ने आघाडी घेतली आहे. आता अखेरचा सामना जिंकून कसोटी मालिका 4-1 जिंकण्याचा निर्धार टीम इंडियाचा असेल  तर कसोटी मालिकेचा गोड करण्यासाठी इंग्लंड सज्ज झाली आहे. 

पाच कसोटी सामन्याची सुरुवात इंग्लंडने विजयी केली होती. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पलटवार केला. भारतीय संघाने सलग तीन सामन्यात बाजी मारत मालिका खिशात घातली. आता अखेरचा सामना जिंकून WTC मध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.  

जसप्रती बुमराह संघात परतल्याने भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भारतीय संघ तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.  जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. तर आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. कुलदीप यादव अथवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते. फलंदाजीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

केएल राहुल तंदुरुस्त नसल्यामुळे रजत पाटीदार याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. अथवा देवदत्त पड्डीकल पदार्पण करु शकतो. सरफराज खान यानं राजकोट कसोटीत शानदार खेली केली. पम रांची कसोटीमध्ये त्याला अपयश आले. दुसरीकडे यशस्वी जायस्वाल यानं संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याला या मालिकेत 800 धावा करण्याची संधी असेल.