उष्णता (Summer season) प्रचंड वाढली आहे. थंडगार होण्यासाठी पोहायला जायला अनेकांना आवडतं. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी असो किंवा मूड फ्रेश करण्यासाठी, उन्हाळ्यात पोहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे पोहणारे लोक त्यांच्या आवडीच्या स्विमिंग पूलमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मात्र, पोहताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. पोहण्याचा (Swimming) पुरेपूर आनंद घेण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याविषयी जाणून घेऊया. अनेकांना उन्हाळ्यात पोहायला स्विमिंग पूलमध्ये डुंबायला आवडतं.
पोहणं हा चांगला व्यायाम आहेच, त्यामुळे खूप हलकं आणि आरामदायी वाटतं. पण, स्विमिंग पूलमध्ये आढळणारे क्लोरीन आणि सूर्यकिरणांमुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. स्किन इन्फेक्शन, टॅनिंग आणि सनबर्न सारखे त्रास होऊ शकतात. मात्र, पोहताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही काळजी न करता पोहण्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. मॉइश्चरायझर लावायला विसरू नका – स्विमिंग पूलला जाण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेली, ग्लिसरीन किंवा डायमेथिकॉन आधारित मॉइश्चरायझर लावू शकता. तुमच्या त्वचेचे पूलमधील क्लोरीनपासून संरक्षण होईल.
सनस्क्रीन वापरा – उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लावणे फार महत्त्वाचे आहे. पोहायला जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावणे चांगले. यामुळे टॅनिंग आणि सनबर्नचा त्रास होणार नाही.
केसांना स्विमिंग कॅप – सूर्याची अतिनील किरणे आणि स्विमिंग पूलचे पाणी त्वचेला तसेच केसांनाही घातक ठरू शकते. त्यामुळे स्विमिंग करताना केसांना स्विमिंग कॅप लावायला विसरू नका. काही वेळा तसेच पोहल्यास हायड्रेट हेअर मास्क लावा आणि शॉवर घ्या.
सनग्लासेस वापरा- डोळे हा शरीरातील सर्वात नाजूक अवयवांपैकी एक आहे. पाण्यात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी डोळ्यांवर सनग्लासेस किंवा स्विमिंग ग्लासेस घाला. शिवाय पोहल्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा.
पोहल्यानंतर आंघोळ – अर्थात तुम्ही स्विमिंग पूलमध्ये कितीही वेळ घालवला असला तरी पोहल्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करायला विसरू नका. स्विमिंग पूलमध्ये असलेले क्लोरीन त्वचेवरून काढून टाकण्यासाठी स्वच्छ पाण्याने आंघोळ करा आणि आंघोळीनंतर त्वचेला सौम्य क्लिंझरने स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.