टी-20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. तर भारताला देखील उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात कोणताही बदल करणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 31 वेळा आमने-सामने आला आहे. यामध्ये भारताने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 11 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. एक सामना अनिर्णित राहिला. तर टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 5 सामने झाले. यामध्ये 4 सामने भारताने, तर 1 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार?, भारत 2023 मधील वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्याचा हिशोब चुकता करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.