महागाईचा परिणाम दुधावरही! अमूल, मदरनंतर आता……

एका बाजूला दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk Farmers) दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजुला विविध दुध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करताना दिसत आहे. अमूलआणि मदर (Madar) डेअरीनंतर आता परागनेही दुधाच्या दरात (Parag Milk Price) वाढ केली आहे. परागने दुधाच्या दरात प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं पगार दुधाची किंमत आता प्रतिलिटर 66 रुपयांवरुन 68 रुपयांवर गेली आहे.  महागाईचा परिणाम आता दुधावरही दिसून येत आहे. आधी अमूल, मग मदर डेअरी, आता परागचे दुधही महाग झाले आहे.

परागच्या दोन्ही एक लिटर व्हरायटी पॅकमध्ये प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पराग गोल्ड 1 लीटरची किंमत 66 रुपयांवरून 68 रुपये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पराग दुधाचे नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. पराग डेअरीचे जीएम, विकास बालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, परागच्या बाजारात उपलब्ध असलेल्या 1 लिटरच्या दोन्ही पॅकच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, अर्धा लिटर पॅकमध्ये प्रत्येकी एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं पराग गोल्ड अर्धा लिटरची किंमत 33 रुपयांवरुन 34 रुपयांपर्यंत वाढली आहे.

अर्धा लिटर पराग मानक दुध आता 30 रुपयांऐवजी 31 रुपयांना झाले आहे. याशिवाय अर्धा लिटर टोन्ड दुधाचा दर 27 रुपयांऐवजी 28 रुपये झाला आहे. 2 जून रोजी अमूल आणि इतर दूध उत्पादक कंपन्यांनी दरात वाढ केली होती. त्यानंतर आता परागनेही आपल्या दुधाच्या दरात वाढ केलीय. एका बाजुला अतिउष्णतेमुळे दुधाचे उत्पादनही कमी होत आहे. अशातच आता दुधाच्या दरात वाढ झाली आहे. पराग दररोज सुमारे 33 हजार लिटर दुधाचा पुरवठा करत आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ केलीय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले होते.

दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये देखील अमूलने गुजरातमध्ये दुधाचे दर वाढवले ​​होते. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) राज्यभरात अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे हे दर वाढवण्यात आले असल्याची माहिती अमूलने दिली होती.