टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा…..

कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मागच्या वर्षी अल् निनोच्या स्थितीमुळे पाऊस कमी झाला. यामुळे एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाईच्या झळा कोल्हापूर जिल्ह्यातील ११७ गावे व १२८ वाड्यांना बसण्याची शक्यता आहे.

१९ गावे व ३५ वाड्यांना थेट टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी तीन कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.मार्चअखेरपर्यंत कागल, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील २३ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

एप्रिलनंतर टंचाईची झळ अधिकच दाट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कोटी २० लाख, खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी ९१ लाख १७ हजार, तर नवीन जलकूपनलिकेसाठी ६९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.