कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलेच नव्हतं…

कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता,” असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. हा त्यांचा निर्णय आहे. सांगलीत काँग्रेस लढणार आहे. विशाल पाटीलच उमेदवार असतील आणि ते निवडून येतील, असेदेखील त्यांनी ठणकावून सांगितले.कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे. शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची जागा घेतली. महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही जागा घेतली. मात्र, या जागेच्या बदल्यात सांगलीतील काँग्रेसची जागा देण्याचा विषय झाला नव्हता. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढेल, दोन दिवसांत याचा निर्णय सकारात्मक होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.