इचलकरंजी, महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिना निमित्त संपूर्ण शहरात प्लॅगेथॉन मोहीम (प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम) संपन्न झाली. त्यामध्ये शहरातील सुमारे तीन टन प्लॅस्टीक कचरा उचलण्यात आला तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ७ हजार ९०० रूपये इतका दंड आकारण्यात आला. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळा. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवार ता. ५ जून रोजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व वॉर्ड मध्ये प्लॅगेथॉन मोहीम (प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम) हाती घेण्यात आली होती. या मोहिमेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा आयुक्त विजय राजापुरे, सहा आयुक्त रोशनी गोडे यांच्या उपस्थितीत करणेत आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी यांनी प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेणेत आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मोहिमेत शहरातील सर्व वॉर्ड मध्ये महानगरपालिकेच्या विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विभागाकडील अधिकारी कर्मचारी आणि सदर वॉर्ड मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या सहभागाने प्लॅगेथॉन मोहीम यशस्वीपणे राबविणेत आली. मोहीमेमध्ये जवळपास ३ टन प्लॅस्टिक कचरा जमा करणेत आला. तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ७ हजार ९०० रुपये इतका दंड आकारण्यात आला.या मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, सहा संचालक नगररचना प्रशांत भोसले, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुगकर, रफिक पेंढारी, विजय पाटील, संजय कांबळे, कविता सोळंकी आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
