आजपासून इचलकरंजीत चार दिवस पंचगंगा नदीवरील रेणुका देवीची भरणार यात्रा…..

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. अनेक भाविक परगावाहून देवतांच्या दर्शनासाठी, यात्रेसाठी गावी येत असतात. कर्नाटकातील सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा व दर्शनासाठी रवाना झालेल्या शहरातील यात्रेकरूंच्या बैलगाड्यांचे काल रविवारी १६ फेब्रुवारी सायंकाळी पंचगंगा नदीतीरावर आगमन झाले . त्यानंतर आज सोमवार १७ फेब्रुवारीपासून पंचगंगा नदी काठावर रेणुका देवीची यात्रा भरत आहे. बुधवारी सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेसाठी गेलेल्या बैलगाड्या आणि इतर वाहनांचे रविवारी सायंकाळपासून पंचगंगा नदीकाठावर आगमन होत आहे.

आज सोमवारपासून चार दिवस पंचगंगा नदीवरील रेणुका देवीची यात्रा भरणार आहे. सौंदत्ती रेणुका देवी यात्रेसाठी गेलेल्या बैलगाडी यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होवून त्या गाड्या इचलकरंजीत पंचगंगा नदीतीरावर पोहचण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर या बैलगाड्या शहराच्या हद्दीतील पंचगंगा नदी तिरावर मुक्काम करतात. यंदा १७ फेब्रुवारीपासून रेणुका देवीची नदीवरील यात्रा भरणार आहे.