व्याजाशिवाय मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज! जबरदस्त सरकारी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला आहे. मात्र ही योजना काय आहे, हे अद्यापही अनेकांना माहित नाही.या योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्याची घोषणा केली होती.

या योजनेअंतर्गत महिलांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते आणि तेही कोणत्याही व्याजाशिवाय. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेऊ..

केंद्र सरकारची लखपती दीदी योजना हा प्रत्यक्षात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत सरकार महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी पात्र बनवते, जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकेल. या योजनेंतर्गत महिलांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. जे स्वयं-सहायता गटांद्वारे आयोजित केले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे. याबद्दल सरकारने दावा केला आहे की, ही योजना सुरु केल्यापासून आतापर्यंत सुमारे 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात यश आले आहे.

महिलांना बळ देण्याच्या या उपक्रमात कौशल्य प्रशिक्षणासोबतच महिलांना शासनाकडून भरीव आर्थिक मदतही दिली जाते. सरकार लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करते आणि विशेष बाब म्हणजे ती पूर्णपणे व्याजमुक्त आहे.

लखपती दीदी योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते. व्यवसाय सुरू करण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यापर्यंत मदत केली जाते. लखपती दीदी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. कमी खर्चात विमा सुविधेची तरतूदही करण्यात आली आहे. महिलांना कमाईसोबत बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला सरकारच्या लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकते. यासाठी महिलेने राज्यातील मूळ रहिवासी असणे आणि बचत गटात सहभागी होणे बंधनकारक आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि तुमची व्यवसाय योजना काय आहे, हे तुम्हाला तुमच्या प्रादेशिक स्वयं-सहायता गट कार्यालयात जमा करावी लागेल.

यानंतर अर्ज तपासला जाईल आणि मंजूर केला जाईल. त्यानंतर कर्जासाठी तुमच्याशी संपर्क साधला जाईल. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक व्यतिरिक्त, अर्जदाराने वैध मोबाइल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागणार.