खासदार धैर्यशील मानेंचा गौप्यस्फोट!

राजू शेट्टी हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते आहेत. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही दगडांवर हात ठेवला आहे.त्यांचं हे कारस्थान जनतेने ओळखले आहे. जनता राजू शेट्टी यांना पुन्हा नाकारणार अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी साम टीव्हीशी बोलताना शेट्टींविषयी केली.

लाेकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत नुकतेच एकमत झाले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असे कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीमधील महाविकास आघाडीच्या बैठकीत सूर हाेता.

त्यावेळी शेट्टी सोबत आले तर ठीक अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असा निर्धार करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांना तयारी लागण्याची सूचनाही केली.

आज ठाकरे गटाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टीं यांनी दोन्ही दगडांवर (महाविकास आघाडी आणि महायुती) हात ठेवल्याचे म्हटले. भाजपने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, मी निवडून आलो की तुमचाच असा शब्द राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी केला.