माणगांव ग्रामपंचायतची लर्निंग सेंटर म्हणून निवड!

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत पंचायत लर्निंग सेंटर म्हणून हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतला सात लाखाचा निधी मिळणार आहे. माणगाव ग्रामपंचायतीने यांनी आत्तापर्यंत विविध ऐतिहासिक व नवीन उपक्रम राबवले आहेत.

यामध्ये कोव्हिड काळामध्ये लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारणारी पहिली, विधवा प्रथा बंद करणारी पहिली ग्रामपंचायत, ९० वर्षावरील जेष्ठांना प्रतिकात्मक सरपंच पद, स्मार्ट सिटी अंतर्गत ७२ सी. सी. टी. व्ही कॅमेरे व हायमास्ट बसवण्यात आले. तसेच राज्यातील सोलर विजेचा वापर करणारी ग्रामपंचायत, कन्यारत्न योजना, मोफत अंत्यविधी साहित्य पुरवणे, माहेरची साडी उपक्रम, तसेच लेक लाडकी माझ्या गावची अशा विविध योजना या ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या गेल्या आहेत.

आतापर्यंत ग्रामपंचायतीने स्मार्ट व्हीलेज जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाखाचा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषदचे आदर्श यशवंत ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक असे सर्व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.