बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धूवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे, त्यातच काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार देखील झाला. यानंतर आता बाबा सिद्दीकीच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी जोडला जात असल्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या घरी जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींशिवाय कुणालाही परवानगी नाही. शुटींगवेळीही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.सलमान खानच्या जीवाला प्रचंड धोका असल्यामुळे पोलिसांसमोरही मोठं आव्हाण निर्माण झालं आहे. सलमान खान आता सुरक्षेच्या कारणासाठी आगामी शूटींग रद्द करणार असल्याची माहिती आहे.
सलमान खानने काही दिवसांपूर्वी बिग बॉस 18 वीकेंड का वार एपिसोड शूट केला. यावेळी सलमानने म्हटलं की, कमिटमेंटमुळे मला शूटींगसाठी यावं लागलं, नाहीतर मला इथे यायचं नव्हतं. बिग बॉस वीकेंड का वारचं शूट 60 हून अधिक सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात करण्यात आलं होतं. यानंतर सलमान त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाचं शूटिंग करणार नाही.
