मंडलिकांसाठी दबाव वाढला…….

एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Election 2024) महायुतीच्या उमेदवाराबाबत पेच आहे. महायुतीत कोल्हापुरच्या जागेवर उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जाते.

शिवसेनेच्या फुटीनंतर उमेदवारीचा शब्द घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या संजय मंडलिकांसाठी (Sanjay Mandalik)पुन्हा दबाव वाढला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरून ठेवला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार-गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या १३ जागांचा तेथे निर्णय होईल, असे विश्‍वसनीय वृत्त आहे.