मोठी बातमी! या दिवशी जाहीर होणार CBSE 10वी, 12वीचे निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर होण्याच्या तारखेबाबत बोर्डाने कळवले आहे की, दोन्ही वर्गांचे निकाल 20 मे नंतर कधीही जाहिर होऊ शकतात.

2023 मध्ये CBSE ने 12 मे रोजी 10वी आणि 12वी चे निकाल जाहीर केले होते. अधिकृत सूचनेनुसार, ‘CBSE बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल 20 मे 2024 नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.’ यावर्षी CBSE 10वीची परीक्षा 13 मार्च रोजी संपली. तर, CBSE 12वीचा शेवटचा पेपर 2 एप्रिल 2024 रोजी झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी सीबीएसई बोर्डाचे निकाल उशिराने लागत आहेत. सन 2023 मध्ये, CBSE 10वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली होती. तर 12वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 05 एप्रिल दरम्यान झाली होती. दोन्ही वर्गांचे निकाल त्याच वर्षी 12 मे रोजी जाहीर झाले.

यावर्षी सीबीएसई 10वीची परीक्षा 13 मार्च रोजी संपली. तर 12वीचा शेवटचा पेपर 2 एप्रिल 2024 रोजी झाला होता. दोघांचे निकाल 20 मे नंतर लागण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे प्रगती पुस्तक तपासू शकतात.