अलीकडच्या या दिवसांमध्ये उन्हामध्ये खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जगजाहीर आहेच. तर सांगोल्या मध्ये पाण्याची खूपच तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे सांगोला तालुक्यातील गाव वाड्यावर पाण्याची परिस्थिती ही गंभीर होत चालल्याचे चित्र दिसत आहे. 15 मार्च अखेर तालुक्यातील 231 हातकंप कोरडे पडले आहेत.
नद्या ओढ्यांवरील 19 बंधारे व सहा तलाव हे एकदम ठणठणीत कोरडे पडल्याने शेती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
चालू वर्षांमध्ये सांगोला तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावांना पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे. तसेच शेतीचा पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. टेंभू म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून नद्यांवरील बंधारे भरून दिले तरच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.