आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात शुक्रवारी 22 मार्चपासन होतेय. लोकसभा निवडणुकांमुळे 17 व्या मोसमातील पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार या पहिल्या टप्प्यात 2 डबल हेडरसह एकूण 21 सामने पार पडणार आहेत. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी सर्व तयारी झाली आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये या 17 हंगामासाठी उत्साहाचं वातावरण आहे. या मोसमातील पहिला सामना हा गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना या हंगामातील संपूर्ण सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? हे जाणून घेणार आहोत.आयपीएलमधील संपूर्ण सामने हे मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येतील. यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य स्थानिक भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना सामन्यासह आपल्या भाषेत कॉमेंट्रीची मजा घेता येणार आहे. तसेच सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. आयपीएलमधील दुपारचे सामने 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तसेच सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.
यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा आहे. हा सामना सीएसके विरुद्ध आरसीबी असा आहे. अर्थात धोनी विरुद्ध विराट असा हा थेट सामना असल्याने क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सूक आहेत. हा सामना बंगळुरुतील एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे जवळपास सर्व तिकीट बूक झाले आहेत. यावरुन पहिला सामना किती धमाकेदार असेल, याचा अंदाज येतो.