सांगोला लायन्स क्लबचा हिरो अवॉर्डने सन्मान

लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांच्या मार्गदशनाखाली समाज्याच्या अभ्युदयासाठी विविध प्रकारे कार्य सुरु आहे. त्यामध्ये मूल्ये व मानवाच्या गरज जपण्याचे कार्य प्रयत्नपूर्वक केलेले आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने आखून दिलेल्या कार्यक्रमांपैकी रक्तदान शिबीर , हृदयरोग तपासणी, वूमन मेनोपॉज , ठिसूळपणा तपासणी शिबीर , मोफत नेत्र तपासणी शिबीर , तपासणी शिबीर , मधुमेह तपासणी शिबीर , महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर , भुकेल्याना भोजन व युवकांना प्रेरित करण्यासाठीचे विविध कार्यक्रम प्रमाण मानून नाशिक येथे झालेल्या ३२३४ बहुप्रांत परिषेदेमध्ये मानवतावादी गरजांच्या पूर्ततेसाठी सांगोला लायन्स क्लबचा हिरो अवॉर्डने सन्मान झाला.

बहुप्रांताचे अध्यक्ष सुनील देसर्डा यांच्या हस्ते व बहुप्रांताचे उपाध्यक्ष ला. भोजराज नाईक- निंबाळकर , सचिव ला. बलवीर सिंग यांच्या उपस्थितीत सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. उन्मेश आटपाडीकर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कॅबिनेट ऑफिसर ला. प्रा. धनाजी चव्हाण , सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला. अजिंक्य झपके, सदस्य ला. प्राचार्य अमोल गायकवाड, ला. प्रा. शिवशंकर तटाळे, ला. प्रा. दि. डी. के. पाटील, ला. प्रा. मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते .