CSK vs RCB सामन्यावर पावसाचं विघ्न…..

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा, आयपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईच होम ग्राऊंड म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या हंगामात ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

सामन्याच्या एक दिवसापू्र्वीच एमएस धोनीने कर्णधारपदावरुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करताना दिसेल. यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सामन्यावेळी आभाळ मोकळं असेल. अॅक्यूवेदरच्या वृत्तानुसार, सामन्यावेळी चेन्नईतील हवामान २९ ते ३० डिग्री सेल्सियस इतकं असू शकतं असा अंदाज व्यक्ता केला गेला आहे.

संध्याकाळी ४ च्या सुमारास वातावरण ढगाळ असेल. मात्र त्यानंतर आभाळ मोकळं असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना शानदार ओपनिंग सेरेमनीसह २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. मात्र खेळाडूंना चेन्नईच्या उष्ण वातावरणाला सामोरं जावं लागेल.या सामन्यावेळी पाऊस पडणार नाही, ही क्रिकेट चाहंत्यासाठी गुड न्यूज आहे. मात्र सामन्यावेळी धावांचा पाऊस पडणार यात काहीच शंका नाही. चेन्नईकडून एमएस धोनी तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहली खेळताना दिसून येणार आहे. या दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.