पंचगंगेतील मगरींनी ‘त्या’ तरुणाला खाल्लं असं वाटलं पण ……

शिरोळ तालुक्याच्या शिरढोण येथील आदित्य बंडगर हा युवक पंचगंगा नदी पात्रात पोहायला गेला होता. मात्र नदीत सुर मारताच  पुढे काय झाले त्याला समजले नाही. आदित्य पाण्याच्या प्रवाहात नदीपात्रात काठाकडे येण्याच्या प्रयत्नात गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला. तब्बल 25 फूट खोल अशा या भागात तो अडकून पडला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या एका युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आलंय. गेल्या पाच दिवसापासून पंचगंगा नदी पात्रात हा तरुण बेपत्ता होता. धक्कादायक बाब म्हणजे मगरींचा वापर परिसरात हा तरुण अडकून पडला होता. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. अखेर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी तरुणाला शोधून काढलं आणि जीवनदान दिलं. या सगळ्या प्रकारामुळे तरुणाला जबर धक्का बसला आहे.

आदित्य मोहन बंडगर असं (19 वर्षे) या तरुणाचं नाव असून गेल्या पाच दिवसापासून मगरीचा वावर असणाऱ्या परिसरात आणि गर्द झाडे झुडपाच्या मध्ये तो अडकून बसला होता. तब्बल पाच दिवस रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी शोध मोहीम राबवली होता. अखेर पंचगंगा नदी पात्राजवळील जय हिंद पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल शेजारील खड्ड्यात हा तरुण असल्याचे दिसून आलं. आदित्य गेल्या पाच दिवसांपासून बचावासाठी आकांताने ओरडत होता. पण जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजाने त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता. पण अखेर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्याचा शोध घेत मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे.