दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !

१८ मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान-१ या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला.यात प्रश्न-१ (इ) मधील क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली होती. म्हणून शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना निवेदन दिले होते.

शिक्षक भारतीच्या निवेदना नंतर इयत्ता दहावीच्या विज्ञान-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देणे बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे पत्र आज निर्गमित झाले आहे.