देशभरात नाही तर जगाच्या पाठीवरही होळीचा उत्साह पाहिला मिळतो. होळी हा विविध रंगांचा सण…गुलाबी, लाल, हिरवा हे सुंदर रंग एकमेकांवर उधळले जातात. रंगीत पाणी आणि डिजेवरील होळीची गाणी सर्वत्र एकच धुम असते. आपण चित्रपटातील होळी गाण्यामध्ये पांढऱ्या कपड्यांचा वापर पाहिला आहे. पांढरा रंगावर होळीचे विविध रंग अतिशय सुंदर असतात म्हणून ते चित्रपटात घातले जातात.
सेलिब्रिटींची होळीची पार्टीमध्येही अभिनेता आणि अभिनेत्री छान छान पांढऱ्या रंगाचे ट्रेंड कपडे पाहिला मिळतात. गेल्या काही वर्षात होळीला पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड म्हणा किंवा फॅशन आली आहे. त्यामुळे ऑनलाईन असो दुकानात पांढऱ्या रंगाचे विविध कपडे पाहिला मिळतात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या पांढऱ्या कपडे घालण्यामागे शास्त्र आहे. होळीला पांढरे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रातही कारण आहे. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ही कारणं तुम्हाला कळल्यावर या होळीला तुम्ही पण आवर्जून पांढरा रंगाचे कपडे परिधान कराल.
ज्योतिषशास्त्रानुसार पांढरा रंग हा शांती, सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे होलिका दहन असो किंवा होळीला तो परिधान करणे शुभ मानले जाते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा आपल्यावर प्रभाव होऊ नये म्हणून पांढरे कपडे घातले जातात. पांढऱ्या कपड्याला स्वतःचा असा रंग नसतो त्यामुळे त्यावर कुठल्याही रंग अतिशय शोभून दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, होळीच्या दिवशी राहूदेवता रागीट असतात. त्यामुळे राहूची वाईट नजरचा मानवावर प्रभाव करु नये म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात.
पांढरे कपडे घातल्यामुळे राहूमुळे वाईट कर्मचा परिणाम होत नाही, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. पांढऱ्या रंगाचे कपडे देखील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत तर करतोय त्यासोबत बिघडलेली कामेही होतात, असा शास्त्राचा दावा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामागे वैज्ञानिक कारणही आहे. उन्हाळ्यात पांढर्या रंगाचे कपडे घालणे आरोग्यादृष्ट्या फायदेशीर ठरले जातं. होळीचा हा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे अशावेळी आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून पांढरे कपडे घातले जातात. असंही म्हणतात होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने जीवनात सकारात्मकता येते.