जयंत गुरव यांची अधिकारीपदी निवड

खानापूर येथील जयंत प्रकाश गुरव यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास अधिकारीपदी
निवड महाराष्ट्र लोकसेवा झाली.आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२२
च्या परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले. त्यांनी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आहे.
जयंत गुरव हे सध्या रत्नागिरी येथे आरटीओ म्हणून कार्यरत आहेत. कायमस्वरूपी दुष्काळी भाग असणाऱ्या खानापूरसारख्या ग्रामीण भागातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून जयंत गुरव यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे