इस्लामपूर रस्त्यावरील पेठ गावच्या हद्दीत बनावट शिक्क्यांचा वापर करून पत्र्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याविरूध्द कॉपीराइट कायद्याखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाली. या कारवाईत १ लाख ११ हजार रुपये किमतीचे पत्रे आणि पत्र्यावर छपाई करण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत मुंबई येथील एका पत्रा कंपनीचे अधिकारी हंबीरराव ज्ञानू साठे (वय ५९) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत पांडुरंग माळी (रा. पेठ) याच्याविरूध्द कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अनिकेत माळी याचा पेठ हद्दीत गणेश स्टिल व पत्रा कंपनी या नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात इतर कंपन्यांच्या लोगोचा वापर करून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून बनावट पत्र्यांची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त होताच मुंबई येथील कंपनीचे अधिकारी हंबीरराव साठे यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
पेठमध्ये बनावट शिक्केवापरून पत्र्यांची विक्री
