खानापूर मतदार संघात राजकीय हालचालींना वेग!

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्यनेते संग्राम दादा माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून मोठी ऑफर आली होती. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम नाना माने यांना पुणे येथे आमंत्रित करून खानापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

यानंतर आगामी निवडणुकी संदर्भात सखोल चर्चा झाल्यानंतर खानापूर आटपाडी मतदार संघातून आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम नाना माने यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक काळापासून संग्राम नाना माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला त्यामुळे ओबीसी समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिके नंतर वंचित बहुजन आघाडीने ओबीसी नेते संग्राम नाना माने यांच्या कार्याची दखल घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यास सांगितले आहे.

त्यानुसार संग्राम नाना माने देखील आगामी निवडणूक लढण्यासाठी तयारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदार संघाच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.