अजूनही मतदार यादीत नाव नाही? नोंदणी करण्याची शेवटची तारीख…..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. त्यात दुबार, स्थलांतरित तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे.अनावधानाने मतदार यादीतून नाव वगळला गेले असेल त्यांनाही २७ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची संधी आहे.

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मिळालेला हक्क म्हणजे मतदानाचा. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाची संधी मिळत असते. लोकशाही सक्षम बनविण्यासाठी प्रशासन निवडणुकीअगोदर मतदार यादीचे पुनरीक्षण करीत असते. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासह ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले आहे. तसेच ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदार यादीत नोंदवले नाही. अथवा मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे. त्यांनीही नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदार संघात स्थलांतर केले असल्यास अर्ज क्रमांक ६

अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ अ

इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७

मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरस्त्या करण्यासाठी अर्ज क्रमांक ८

मतदार संघातील निवासाचे ठिकाण बदलेले असल्यास अर्ज क्रमांक ८ अ भरावा लागतो.

मतदार नोंदणी करण्यासाठी ओळखपत्र आणि वयाचा दाखला गरजेचा आहे. ओळपत्रामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, बॅक पासबुक, रेशन कार्ड यापैकी कुठलाही एक प्रमाणपत्र तर वयाच्या दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी कोणत्याही एक कागदपत्रांची आवश्यकता आहे.