शेअर बाजार सलग तीन दिवस बंद!

 अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवणून भरपूर पैसे कमवातात. आठवड्यात एकूण पाच दिवस शेअर दिवस चालू असतो. या पाच दिवसांत कशा प्रकारे पैसे गुंतवले पाहिजेत, त्यासाठी कोणते नियोजन आखले पाहिजे, याचा विचार गुंतवणूकदार आधीपासूनच करत असतात. उद्यापासून (1 जून) जून महिना चालू होत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी नव्या महिन्यासाठी आपली स्ट्रॅटेजी आखली असेल. दरम्यान, याच जून महिन्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद असणार आहे.

या तिन्ही दिवसांत गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येणार नाहीत. मुंबई शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर शेअर बाजाराला किती दिवस सुट्ट्या असतील, याची माहिती दिलेली आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे 1 आणि 2 जून रोजी शेअर बाजार बंद असणार आहे. यासह आगामी 15, 16, 17 जून रोजीदेखील शेअर बाजार बंद असणार आहे. त्यामुळे या सुट्ट्या चालू होण्याआधीच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करून ठेवावे लागणार आहेत. 17 जूनपासून चालू होणाऱ्या भांवडवली बाजारात पाच ऐवजी फक्त चार दिवसच शेअर बाजार चालू असणार आहे.